बँक कर्मचार्यांचा 22 ऑगस्ट रोजी देशव्यापी संप
नवी दिल्ली, दि. 21, ऑगस्ट - बँकांचे एकत्रीकरण तसेच अन्य मागण्यांसाठी देशभरातील 10 लाख बँक कर्मचारी 22 ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारणार आहेत . परिणामी मंगळवारी देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत . आयसीआयसी, क्सिस, कोटक महिंद्रा, एचडीएफसी या खासगी बँका संपात सहभागी होणार नाहीत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या बँक कर्मचार्यांच्या शिखर संघटनेने संपाची हाक दिली आहे .
