Breaking News

रायगड जिल्ह्यात खारफुटीची कत्तल करणार्‍या कंपनीविरोधात गुन्हे दाखल : मुख्यमंत्री


मुंबई,दि.2 : रायगड जिल्हयात खारफुटीची कत्त
ल करणा-या कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्यामार्फत तपास सुरू आहे, अशी माहिती विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी आज दिली. धरमतर खाडी किनारी जेएसडब्ल्यू कंपनीने खारफुटीची कत्तल करून अनधिकृतपणे जेटीच्या बांधकामासंदर्भात सदस्य भास्कर जाधव यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, धरमतर खाडीतील अस्तित्वातील जेट्टीचा विस्तार करण्यासाठी अतिरिक्त वॉटरफ्रंट मंजूर करण्यासंदर्भात महाराष्ट मेरीटाईम बोर्डाने मे. जेएसडब्लयू धरमतर पोर्ट प्रा.लि. या कंपनीशी करार केला होता. या कंपनीने अस्तित्वातील जेट्टीच्या विस्तारासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथोरिटी आणि केंद्रीय पर्यावरण व वने मंत्रालय यांच्या परवानग्या प्राप्त केल्या आहेत. मात्र, पर्यावरण कायद्याचे उल्लंघन केल्याने हरित लवादात तक्रार दाखल केली असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.