Breaking News

चीन सीमेवर तैनात भारत-तिबेट सीमा पोलीस दलातील जवान, अधिका-यांची अखेर पदोन्नती

नवी दिल्ली, दि. 22, ऑगस्ट - चीन सीमेवर तैनात भारत-तिबेट सीमा पोलीस दलातील जवान व अधिका-यांची सहा वर्षांनंतर अखेर केंद्र सरकारकडून  पदोन्नती करण्यात आली. 1654 अधिकारी व जवानांची सहा वर्षांपूर्वी म्हणजे 2011 साली पदोन्नती होणे अपेक्षित होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे ही  पदोन्नती प्रलंबित होती. याबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग म्हणाले की, सहा वर्ष वाट पहावी लागली तरी या जवानांनी धीर सोडला नाही. पदोन्नतीमुळे  जवानांचे मनोबळ नक्कीच वाढले असेल असे ते म्हणाले. भविष्यातील पदोन्नतीसाठी कोणतेही अडथळे येणार नाहीत याची काळजी घ्या, असे निर्देश त्यांनी  गृह मंत्रालयाला दिले.
2015 साली भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या लडाखमधील पोस्टला भेट दिली तेव्हा पहिल्यांदा मी कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेतला. त्यावेळी  जवानांच्या कार्यतत्परतेचे व कामाप्रति असलेल्या प्रेमाचे विशेष कौतूक वाटल्याचे ते म्हणाले.