Breaking News

अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 50 ठार

काबुल, दि. 08, ऑगस्ट - अफगाणिस्तानमधील सारीपुल प्रांतात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही  समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात सुरक्षा दलाचे सात जवान शहीद झाले आहेत. 
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, दहशतवाद्यांनी पुन्हा निष्पाप नागरिकांचा जीव घेतला  आहे. त्यांचे हे कृत्य म्हणजे मानवी अधिकारांचे उल्लंघन आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पोलिसांच्या तळावर हल्ला केला. त्यानंतर त्यांनी येथील एका गावात घुसून गावातील घरे जाळली. दहशतवाद्यांमध्ये तालिबान  आणि इसिसच्या दहशतवाद्यांचा समावेश असल्याचे एका प्रवक्त्याने सांगितले. तर आम्ही निष्पाप नागरिकांचा जीव घेतला नाही असे तालिबानकडून सांगण्यात आले  आहे.