Breaking News

नागपुरात सुगंधीत तंबाखू, साहित्य जप्त, अन्न व औषधी प्रशासन विभागाची कारवाई

नागपूर, दि. 25, ऑगस्ट - यशोधरा पोलिस स्टेशनतंर्गत येणार्‍या वांजरा वस्ती येथील सुगंधीत तंबाखू बनविणार्‍या कारखान्यावर अन्न व औषधी प्रशासनाने धाड  टाकून एक लाख 900 रुपयांचा साठा जप्त केला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा  अधिकारी विनोद धवड व प्रफुल्ल टोपले यांनी केली.
यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार वांजरा वस्तीत सुगंधीत तंबाखू बनविण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधी विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे  सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मधुकर शिर्के यांच्या पथकाने धाड टाकली. यावेळी कारखान्यात सुगंधीत तंबाखू बनिण्याचे काम सुरू होते. त्यानंतर अन्न सुरक्षा व  मानदे कायद्यातंर्गत तंबाखूची तपासणी करून 30 हजार 900 रुपयांचा सुगंधीत तंबाखू व बनविण्याकरिता लागणारे 70 हजार रूपये किमतीचे साहित्य असा 1 लाख  900 रुपयांचा साठा जप्त केला. तसेच कारखान्याला सिलबंद करण्यात आले.