महिला क्रिकेटसाठी सध्या सुवर्ण काळ - क्रिकेटपटू मोना मेश्रामचे मनोगत
नागपूर, दि. 01, ऑगस्ट - भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वचषक सामन्याचा उपविजेता ठरला. या यशामुळे क्रिकेटवेड्या भारतीयांच्या घराघरात महिला क्रिकेट पोहचले. त्यामुळे देशात महिला क्रिकेटचा सुर्वण काळ आल्याचे मनोगत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारी विदर्भातील क्रिकेटपटू मोना मेश्रामने व्यक्त केले. नागपूर स्पोर्टस जर्नालिस्ट संघटना (एसजेएएन)तर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात मोना बोलत होती.
विश्व करंडकातील अनुभवाबाबात बोलतांना मोना म्हणाली की, इंग्लंड संघ ‘होमग्राऊंड’ वर खेळत होता, संघात अनुभवी खेळाडूंची संख्याही अधिक होती आणि समर्थकही मोठ्या संख्येने होते. भारतीय संघाची कर्णधार मिताली राज व झुलन गोस्वामी यांना वगळता अनेक खेळाडू पहिल्यांदाच विश्वकरंडकात खेळत होत्या. भारतीय संघाला विजयाची सुवर्णसंधी होती. परंतु, प्रतिस्पर्धी संघाच्या तुलनेत आमचा अनुभव कमी पडल्यामुळे पराभवाचा सामना करावा लागला.पहिल्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश करून अंतिम लढतीत स्थान मिळविणे हे गौरवस्पद क्षण होते. आम्ही दिग्गज संघांना पराभूत करून विश्व चषकातील अंतिम टप्प्यापर्यंत मजल मारली हीच आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे तिने सांगितले. स्पर्धेपूर्वी बीसीसीआयने महिला क्रिकेटकडे लक्ष दिले याचा संघाला फायदा झाल्याचे तिने स्पष्ट केले.