धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी भायखळ्यात आंदोलन
मुंबई, दि. 01, ऑगस्ट - धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांकडून आज भायखळा येथे जोरदार घोषणाबाजी केली. यशवंत सेनेने आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते राणीचाबाग येथे दजमले होते. मात्र पोलिसांनी मोर्चा काढण्यास परवानगी नाकारली. आझाद मैदांनावर पोहोचल्यानंतर मंत्र्यांची भेट घेऊन आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडणार, असे आंदोलकांकडून सांगण्यात आले.