Breaking News

अश्‍लिल फोटो काढून बदनामी करणार्‍या युवकाला बेड्या

नाशिक, दि. 27, ऑगस्ट - मैत्रिणीसमवेत काढलेल्या सेल्फीची अश्‍लिलन युवतीची बदनामी केल्याप्रकरणी मखमलाबाद राजवाड्या शेजारी राहणार्‍या युवकास  पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात वियनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक संजय कटारे (रा.मोरेश्‍वर  बिल्डींग,रॉयल अपा.) असे संशयीत युवकाचे नाव आहे.
माणेकशानगर भागातील 19 वर्षीय युवतीने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. युवक युवती एका अकादमीत शिक्षण घेत असून त्याच्यात मैत्रीचे संबध होते.  याकाळात संशयीताने सेल्फी काढण्याच्या बहाण्याने फोटो काढले होते. या फोटोंचे मिक्सिंग करीत त्याने अश्‍लिल फोटो तयार केले व मित्र मंडळी आणि मुलीच्या  नातेवाईकांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाठविले.तसेच त्याने मुलीशी मोबाईलवर अश्‍लील भाषा वापरून वांरवार पाठलाग आणि मारहाण करीत युवतीचा  विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.