पंतप्रधान शेख हसीना यांच्या हत्येचा प्रयत्न; 10 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा
ढाका, दि. 21, ऑगस्ट - बांगलादेशच्या पंतप्रधान बेगम शेख हसीना वाजेद यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून एका स्थानिक न्यायालयाने आज 10 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.
ढाकामधील जलदगती न्यायालयाच्या न्या. मुमताज बेगम यांनी 17 वर्षांपूर्वीच्या खटल्यात आणखी 9 जणांना तुरुंगवासाची शिक्षाही सुनावली. या खटल्यातील हरकत-उल-जिहादशी संबंधित आरोपी मुफ्ती अब्दुल हन्नानला अन्य एका प्रकरणात याआधीच मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्याचे नाव या खटल्यातून हटवण्यात आले आहे.
20 जुलै 2000 रोजी गोपालगंज भागातील कोटालीपाडा येथील एका शाळेत पंतप्रधान हसीना यांचे भाषण होणार होते. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्यासपीठाजवळ 76 किलो स्फोटके सापडली. त्यानंतर दुस-याच दिवशी कोटालीपाडा येथे हसीना यांच्या आगमनासाठी तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडनजीक 80 किलो स्फोटके जप्त करण्यात आली.
तपासाअंती गुन्हे अन्वेषण विभागाच्या गुन्हे शाखेने 8 एप्रिल 2001 रोजी 10 जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर 2010 मध्ये हा खटला गोपालगंज येथील न्यायालयातून ढाकामधील जलदगती न्यायालयात वर्ग करण्यात आला.