फुटिरतावादी नेता शब्बीर शाहच्या कोठडीत एक दिवसाची वाढ
नवी दिल्ली, दि. 03, ऑगस्ट - पतियाळा हाऊस न्यायालयाने फुटिरतावादी नेता शब्बीर शाह यांच्या कोठडीत एक दिवसाची वाढ केली आहे. अवैध मालमत्ता बाळगल्याप्रकरणी सक्तवसूली संचालनालयाकडून त्याची चौकशी केली जात असून संचालनालयाकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार न्यायालयाने शाह यांच्या कोठडीत वाढ केली आहे. अनेकदा वॉरंट जारी करूनही शब्बीर न्यायालयात हजर न झाल्याने पतियाळा हाऊस न्यायालयाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
सक्तवसूली संचलनालयाने बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याच्या 7 दिवसांच्या कोठडीच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली.
सक्तवसूली संचलनालयाने बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याच्या 7 दिवसांच्या कोठडीच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली.