Breaking News

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत दोन जवान शहिद

श्रीनगर, दि. 03, ऑगस्ट - काश्मीरमधील शोपिया भागात सुरक्षा दल व सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहिद झाले आहेत.
शोपिया येथील इमाम साहब परिसरातील एका गावात लष्कर व केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त मोहिमेंतर्गत पहाटे 2.30 वाजता गस्त सुरू होती. तेव्हा  जोइपोरा गावात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शोध मोहिम सुरू झाली. दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. या  गोळीबारात मेजर व एक जवान, असे दोघे जण शहिद झाले. दरम्यान एका जखमी जवानाला तात्काळ हेलिकॉप्टरच्या सहाय्याने श्रीनगर येथील लष्कराच्या  रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती एका पोलीस अधिका-याने दिली.