ताजमहलच्या परिसरातील अनधिकृत बांधकामे पाडण्याचे हरित लवादाचे आदेश
नवी दिल्ली, दि. 03, ऑगस्ट - राष्ट्रीय हरित लवादाने ताजमहलच्या परिसरातील अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश दिले आहेत. ताजमहलच्या परिसरातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांचे छायाचित्र याचिकाकर्त्याकडून आज याबाबतच्या सुनावणीदरम्यान लवादासमोर सादर करण्यात आली . लवादाने मुख्य संरक्षकाला ताजमहलच्या परिसरात झालेल्या वृक्षारोपणाबाबतची माहितीही मागितली.
त्यापूर्वी लवादाने आपल्या आदेशात उत्तर प्रदेश सरकारला ताजमहलच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात अनधिकृत बांधकाम होऊ न देण्याचे व या भागातील झाडे न तोडण्याचे आदेश दिले होते. लवादाने हरित पट्ट्याची सीमारेषा आखण्याचेही आदेश दिले होते. ही आखणी करताना भारतीय वन सर्वेक्षण व राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या प्रतिनिधींची उपस्थिती अनिवार्य असल्याचेही सांगण्यात आले आहे.