Breaking News

रिलायन्सस जिआनेे फोनची प्री बुकिंग थांबवली!

मुंबई, दि. 27, ऑगस्ट - रिलायन्सच्या जिओ फोनची प्री बुकिंग 24 ऑगस्टला सुरु झाली. मात्र काही वेळातच फोनच्या बुकिंगला जास्त प्रतिसाद मिळाल्याने  जिओची वेबसाईट क्रॅश झाली. त्यानंतर काही वेळाने पुन्हा वेबसाईट सुरु करण्यात आली. पण अजूनही अनेकांनी फोन बूक केलेला नाही. तुम्हीला जिओ फोन खरेदी  करायचा आहे आणि तुम्ही अजून प्री बुकिंग केली नसेल, तर तुमच्यासाठी निराशाजनक बातमी आहे. कारण जिओने फोनची प्री बुकिंग थांबवली आहे.
जिओच्या वेबसाईटवरुन प्री बुकिंगचा पर्याय हटवण्यात आला आहे. जेव्हा पुन्हा एकदा बुंकिंग सुरु केली जाईल तेव्हा ग्राहकांना कळवण्यात येईल, असं जिओने  म्हटलं आहे. त्यामुळे ग्राहकांना आता पुन्हा एकदा बुकिंग सुरु होण्याची प्रतीक्षा आहे. प्री बुकिंग थांबवण्यात आली असली तरी लवकरच पुन्हा एकदा प्री बुकिंग सुरु  केली जाईल, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. मात्र पुढील प्री बुकिंगची तारीख देण्यात आलेली नाही. लाखोंच्या संख्येमध्ये जिओ फोनची बुकिंग झाल्याचं कंपनीने  म्हटलं आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्हा आता केवळ नोंदणी करु शकता.