Breaking News

जागतिक बॅडमिंटन ; उपांत्य लढतीत सायना नेहवाल पराभूत

नवी दिल्ली, दि. 27, ऑगस्ट - जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत जपानच्या नोझोमी ओकुहरा हिने भारताच्या सायना नेहवाल हिला पराभूत करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत  प्रवेश केला . नोझोमी ने सायनाचा 21- 12, 17-21, 10-21 असा पराभव केला. सामन्याचा पहिला गेम सायनाने 21 -12 असा सहज जिंकला . मात्र दुसर्‍या  गेममध्ये नोझोमी ने तडफदार खेळ करत सायनाला नामोहरम केले . तिसर्‍या गेम मध्ये नोझोमी ने सायनाला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही . या गेममध्ये  सरळ सहा गुण घेत नोझोमी ने सायनाला पूर्णपणे निष्प्रभ केले.