Breaking News

वामनदादा कर्डक यांच्याकडून डॉ. आंबेडकरांचे विचार घरोघरी पोहोचविण्याचे काम



औरंगाबाद, दि.30 ः आपल्या गायनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाच्या घराघरात पोहोचवण्याचे महान कार्य वामनदादा कर्डक यांनी केले, असे मत गंगापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नंदाताई गायकवाड यांनी व्यक्त केले. शिवकृपा मंगल कार्यालयात आयोजित महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी डॉ. सुभाष मंडाले, डॉ.अर्चना त्रिभुवन, घाटी रुग्णालयाचे डॉ.अजय उबाळे, प्रा. गौतम गायकवाड, डॉ.सुनील उबाळे, प्रा. डॉ. संदीप गायकवाड सुप्रसिद्ध गायिका रेखाताई भारती यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम बुद्ध वंदना घेऊन वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याधिकारी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रख्यात आंबेडकरी गायक पंचशीला भालेराव, रेखा भारती, प्रा.डॉ. किशोर वाघ, मेघानंद जाधव, सुनील खरे यांच्या भीम, बुद्ध, वामनदादा यांच्या गीताने उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन जाधव यांनी केले.