Breaking News

नॅक मुल्याकंनासाठी सामुहिक प्रयत्न हवे : कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे


औरंगाबाद, दि.30 : ‘नॅक‘ मुल्यांकनासाठी बदललेले निकष आणि त्याप्रमाणे सर्वच प्राध्यापक, कर्मचा-यांनी सामुहिक प्रयत्न केले तरच आपण उत्तम श्रेणी मिळवू, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘इंटर्नल क्वालिटी अ‍ॅश्यूरन्स सेल’ तर्फे आय क्वॅक सर्व प्राध्यापकांची कार्यशाळा सोमवारी घेण्यात आली. ‘आयक्वॅक’चे अध्यक्ष डॉ.बी.ए.चोपडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी संचालक डॉ. महेंद्र सिरसाठ, सल्लागार डॉ.एम.डी.जहागीरदार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेस वित्त व लेखाधिकारी डॉ.नंदकुमार राठी, माजी संचालक डॉ.सचिन देशमुख, उस्मानाबाद केंद्राचे संचालक डॉ.अरुण खरात यांच्यासह 150 प्राध्यापकांनी सहभाग घेतला. प्रारंभी कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे यांनी ‘नॅक‘ मुल्यांकनात बदललेला निकषाबाबत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय अधिमान्यता व अधिस्वीकृती परिषद अर्थात ‘नॅक’ ने जुलै 2017 मध्ये मुल्यांकनाची नविन नियमावली व निकष घोषित केली. नव्या सात निकषात मोठे फेरबदल झालेले आहेत. विद्यापीठातील माजी विद्यार्थी संघटना अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. सुमारे दीड तासाचे ‘पॉवर पॉईट प्रेझेंटेशन’ डॉ.सिरसाठ यांनी केले. यावेळी विभागप्रमुख, प्राध्यापकांची प्रोग्रामर प्रशांत गवळी, चंद्रकांत कापुरे, विजय साळवे आदींनी प्रयत्न केले.