Breaking News

हरियाणाचे उपमहाधिवक्ता गुरूदास सिंग निलंबित; राम रहिम याची बॅग उचलल्याचा आरोप

पंचकुला, दि. 27, ऑगस्ट - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांची न्यायालयात बॅग उचलल्याप्रकरणी हरियाणाचे उपमहाधिवक्ता गुरूदास सिंग यांचे आज  निलंबन करण्यात आले. आज न्यायालयात सुनावणीनंतर राम रहिम याची बॅग उचलण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यासंदर्भातील दृश्ये कॅमेर्‍यात कैद  झाली आहेत. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. गुरुदास सिंग हे राम रहिम याची बॅग उचलून त्यांच्याबरोबर चालत असल्याचे यात दिसून येत आहे.
राम रहिम याला सोमवारी शिक्षा सुनावली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहेत. तसेच त्याला किमान 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते असेही सांगण्यात येत  आहे.