Breaking News

चांगेफळ येथे सुंदर बैलजोडी स्पर्धा उत्साहात

बुलडाणा, दि. 24 - सिंदखेड राजा तालुक्यातील चांगेफळ ग्राम पंचायतीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही 22 ऑगस्ट रोजी सुंदर बैलजोडी स्पर्धा येथील  कै.भास्कररावजी शिंगणे माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडली. स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळाचे माजी संचालक  जनार्धन मोगल हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर जाधव, संजय गंडे, रामचंद्र मोगल, भास्कर पाटील, गुमनराव सवडे, नायबराव चाळसे, धोंडिबा पर्‍हाड,  सुधाकर तायडे, प्रभाकर मोगल, हरिभाऊ परळकर, आसाराम भालेराव, दुर्योधन शेजुळ यांची उपस्थिती होती. 
या स्पर्धेचे प्रथम बक्षिस-समाधान उत्तम शेजुळ, द्वितीय बक्षीस- योगेश प्रल्हाद खवणे, तृतीय बक्षीस- दिपक ज्ञानदेव मोगल यांच्या बैलजोडीने पटकावले. विजेत्या  बैलजोडी मालकांना रोख पारितोषिक दादाराव नामदेव मोगल, राजेंद्र जनार्धन मोगल व बंडु पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. स्पर्धेचे निरीक्षक म्हणून कोंडिबा भुजंग  मोगल, छगन तुपकर, हसनराव भोसले, वाल्मिक कांबळे, दिनकर सवडे, विठ्ठल शेजुळ, एकनाथ प्रकाश मोगल, दिपक ज्ञानदेव मोगल यांनी काम पाहिले. या स्पर्धेत  एकूण 17 बैल जोड्यांनी सहभाग नोंदवला होता.  यांत्रिकीकरणामुळे दिवसेंदिवस बैलांची संख्या कमी होत चालली आहे. पशुधन व मुक्या प्राण्यांविषयी कृतज्ञता  व्यक्त करण्यासाठी गेली 4 वर्षांपासून मंत्रालय, नवी मुंबईचे कक्ष अधिकारी व गावचे भूमीपुत्र सुरेश मोगल यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतच्या वतीने या आगळ्या  वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ग्रा.पं.सचिव व्ही.एस.सातपुते, दत्ता पर्‍हाड, विनायक गंडे, विकास नरवडे, भानुदास शेजुळ, पुरुषोत्तम मोगल, नागोराव भालेराव आदींनी  परिश्रम घेतले.