श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांकडून पोलिसांवर गोळीबार; एक जवान जखमी
नौगाम,दि.6 : श्रीनगरमधील नौगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एक जवान जखमी झाला. या हल्ल्यानंतर जवानांनी येथील परिसराला घेराव घातला आहे. जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्लेखोर हे दुचाकीवरुन आले होते. या गोळीबारानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोळीबारानंतर येथील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली असल्याचे अधिका-यांनी सांगितले.
