Breaking News

पाकिस्तान सीमेवरून 22 कोटींचे अंमली पदार्थ जप्त


जालंधर,दि.6 : भारत-पाकिस्तान सीमेवरुन अंमली पदार्थ , एक बंदुक, आणि 56 काडतुसे जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचे वजन साडे चार किलो असून त्यांचे बाजार मुल्य 22 कोटी रुपये इतके आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पंजाब पोलिसांबरोबर संयुक्त कारवाई केली. त्यावेळी हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. शनिवारी सीमेवरून एका पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आली होती.