Breaking News

महाआघाडीतून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता : नितीश कुमार

पाटणा, दि. 01, ऑगस्ट - बिहारमधील राजद-काँग्रेस बरोबरच्या महाआघाडीतून बाहेर पडण्यावाचून पर्याय नव्हता असे स्पष्टीकरण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार  यांनी दिले. भाजपच्या पाठिंब्याने पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाआघाडीत राहणे माझ्यासाठी खूप कठीण होऊन बसले होते. माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव सारख्या राजदच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत होते.  मी वारंवार राजदच्या नेत्यांना स्पष्टीकरण देण्याची विनंती केली, पण त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे नाईलाजाने मला महाआघाडीतून बाहेर पडावे  लागले, असे नितीश कुमार म्हणाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान देईल असा एकही नेता सध्या तरी मला दिसत नाही,  असेही नितीश यांनी नमूद केले.