चीन लष्कराकडून उत्तराखंडमध्ये घुसखोरी; 26 जुलै रोजीची घटना
नवी दिल्ली,, दि. 01, ऑगस्ट - डोकलामवरुन भारत-चीनमध्ये सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चीनी लष्कराने उत्तराखंडमधून घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. 26 जुलै रोजी चीनच्या लष्कराने चमोली जिल्ह्यातील बाराहोतीमध्ये घुसखोरी केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या भागातील मेंढपाळांना चीनच्या सैनिकांनी दमदाटी केल्याचे सांगण्यात येते .
26 जुलै रोजी सकाळी 8.30 -9.30 दरम्यान 200-300 चीनी जवानांनी भारतीय सीमेमध्ये घुसखोरी केली. दोन तास हे घुसखोर 200-300 मीटर अंतरापर्यंत भारतीय हद्दीत होते. मात्र या भागात घुसखोरी न झाल्याचे चमोलीच्या जिल्हाधिका-यांनी सांगितले.