Breaking News

’सॅमसंग’च्या उपाध्यक्षांना पाच वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली, दि. 26, ऑगस्ट - जगातील स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री करणार्‍या ’सॅमसंग’चे उपाध्यक्ष जे.वाय.ली यांना दक्षिण कोरियातील एका न्यायालायाने  भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. याच प्रकरणामुळे पार्क ग्यून यांना दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्षपद सोडावे लागले होते. न्यायालयाचा निकाल  आल्यानंतर सॅमसंग कंपनीच्या समभागात 1.5 टक्क्यांनी घसरण झाली. मात्र, ली यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
भ्रष्टाचाराचे आरोप असलेले ली हे फेब्रुवारीपासून तुरूंगात आहेत. लाच देणे आणि परदेशात मालमत्ता विकत घेणे असे आरोपही ली यांच्यावर आहेत.