Breaking News

पंतप्रधान मोदींकडून सरन्यायाधीश मिश्रा यांना शुभेच्छा

नवी दिल्ली, दि. 28, ऑगस्ट - सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यानंतर न्या. दीपक मिश्रा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.  ‘सरन्यायाधीशदाची शपथ घेतल्याबद्दल न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांचे मन:पूर्वक अभिनंदन! त्यांच्या कार्यकाळात त्यांनी योग्य न्यायनिवाडा करावा, यासाठी माझ्याकडून  त्यांना शुभेच्छा’, असे ट्विट मोदी यांनी केले. मिश्रा यांनी आज भारताच्या 45व्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या  या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसह उपराष्ट्रपती वैंकय्या नायडूदेखील उपस्थित होते.