Breaking News

थोरात कारखान्यावर गणेशोत्सवानिमीत्त विविध दर्जेेदार कार्यक्रमांचे आयोजन

संगमनेर, दि. 28, ऑगस्ट - सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत सांस्कृतिक  मंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे गणेशोत्सवानिमीत्त विविध दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक  जग्गनाथ घुगरकर यांनी दिली आहे.
आ. बाळासाहेब थोरात व कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत सांस्कृतिक मंडळाच्यावतीने दरवर्षी थोरात कारखाना  कार्यस्थळावर भव्य गणेशोत्सवाचे आयोजन होत असते. यानिमीत्त राज्यभरातील दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. त्यामुळे कारखाना कार्यस्थळ  हे गणेशोत्सव काळात गणेश भक्तांच्या गर्दीचे ठिकाण बनते.
उद्या मंगळवार दिनांक 29 रोजी रात्री 8. वा देखो मगर प्यार से हे विनोदी नाटक, गुरुवार दि. 31 ऑगस्ट रोजी रात्री 8. वाजता भजन संध्या, शुक्रवार दिनांक 1  सप्टेबर रोजी रात्री 8. वाजता उधळ लोककलेची हा बहुरंगी कार्यक्रम तर रविवार दिनांक 3 सप्टेबर रोजी रात्री 8 वाजता  विनायक महाडीक पुणेकर यांचा  लोकनाट्य तमाशा व मंगळवार दि. 5 सप्टेबर रोजी दुपारी 4. वा श्रीं ची मिरवणूक व विसर्जन कार्यक्रम होणार आहे.
यावेळी आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, कार्यकारी संचालक जग्गनाथ घुगरकर  आदि उपस्थित राहणार आहे. तरी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिक, युवक व महिला भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन बाबासाहेब वर्पे, कारभारी शेणकर,  विजय जगताप, किशोर देशमुख, तात्यासाहेब धुळगंड, केशव वर्पे, बाजीराव शिंदे, कैलास वर्पे, शंकर पानसरे, अरुण जोंधळे, सुर्यभान आहेर, भास्कर दातीर, अशोक  कदम, राजेंद्र सस्कर व अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.