Breaking News

प्रचलित पद्धतीनुसारच गणेश मंडळांना परवानगी- इथापे

200 मंडळांना मंडप उभारणीची परवानगी ; मागील 34 पैकी 32 मंडळांना नोटीस

अहमदनगर, दि. 26, ऑगस्ट - उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उत्सव काळातील मंडप उभारणीचे धोरण महासभेकडून निश्‍चित न झाल्याने यंदाही प्रचलित  पद्धतीनुसारच गणेश मंडळांना परवानगी देण्याची कार्यवाही मनपाकडून सुरु आहे मागच्यावर्षी कारवाई झालेल्या 34 मंडळांना परवानगी नाकारण्यात आली आहे  गुरुवारी रात्रीपर्यंत 200 मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देण्यात आली आहे . 34 पैकी दोन मंडळांनी परवानगी घेतल्याने 32 मंडळांना नोटीस बजावण्यात  आली आहे . अशी माहिती अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी दिली.

मंडप परवानगीसाठी मनपात 

एकाच ठिकाणी परवानगी सरळ व सोप्या पद्धतीने मिळावी यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे .एकाच ठिकाणी कागद तपासणी करून परवानगी   दिली जाते उभारण्यात आलेल्या मंडपाच्या तपासणी करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार गठीत करण्यात आलेल्या तहसीलदाराच्या नियंत्रणाखाली समितीकडून  मंडपाची तपासणी सुरु झाली आहे ,  शहरातील गणेश मंडळाकडून उभारण्यात आलेल्या मंडपाची मनपा कर्मचार्‍याच्या पथकाकडून विनापरवानगी  मंडप उभारणार्‍या  34 मंडळाचे पंचनामे करण्यात आले आहे . त्यातील दोघांनी परवानगी घेतली असल्याने इतर 32 मंडळांना नोटीस बजावण्यात आली आहे .
नोटीस देण्यात आलेल्या मंडळांनी विनापरवानगी मंडप उभारणी केली आहे . असे इथापे यांनी सांगितले. शहर व उपनगरात दोन हजारापेक्षा जास्त मंडपाची उभारणी  झालेली आहे .यात छोट्या मंडपाचाही समावेश आहे . ज्या मंडप उभारणीबाबत तक्रारी आहेत अथवा त्याचा रहदारीसअढथळा येतो
अश्या मंडळाविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. परवानगी घेतलेल्या मंडळामध्ये शहरातील मोट्या मंडळाचा समावेश आहे . त्याची नोंदणी धर्मदाय आयुक्ताकडे  झालेली आहे यंदा मंडळांना  धर्मादाय आयुक्तांना हिशोब द्यावा लागणार आहे . शहरातील तोफखाना भागातील एका सामाजिक कार्यकर्त्याने मंडप उभारणीस हरकत  घेऊन मंडप उभारण्यात येऊ नये असा तक्रार अर्ज पोलिसांकडे केला आहे त्यावर निर्णय झाला नव्हता.