Breaking News

थोरात कारखान्यावर गणेशोत्सवानिमीत्त विविध दर्जेेदार कार्यक्रमांचे आयोजन

संगमनेर, दि. 26, ऑगस्ट -सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे गणेशोत्सवानिमीत्त  विविध दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक जग्गनाथ घुगरकर यांनी दिली आहे.
सांस्कृतिक मंडळाच्या वतीने थोरात कारखाना कार्यस्थळावर भव्य गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यामुळे कारखाना कार्यस्थळ हे गणेशोत्सव काळात गणेश  भक्तांच्या गर्दीचे ठिकाण बनते. यावर्षी शुक्रवार दि.25 ऑगस्ट रोजी श्रीं ची मिरवणूक व स्थापना,रविवार दि. 27 ऑगस्ट रोजी रात्री 8 वा. धमाकेदार लावणी  महोत्सव हा संपुर्ण महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक करणारा भरगच्च लावण्यांचा कार्यक्रम असून यामध्ये लावणी सम्रा-ाी माया खुटेगांवकर,प्राची मुंबईकर,संगीता लाखे,स्वाती  दसवडकर, अर्चना जावळेकर सहभागी होणार आहे. मंगळवार दि.29 रोजी रात्री 8.वा देखो मगर प्यार से हे विनोदी नाटक,गुरुवार दि.31 ऑगस्ट रोजी रात्री 8.वा  भजन संध्या,शुक्रवार दि.1 सप्टेबर रोजी रात्री 8.वा उधळ लोककलेची हा बहुरंगी कार्यक्रम तर रविवार दि.3 सप्टेबर रोजी रात्री 8.वा विनायक महाडीक पुणेकर  यांचा लोकनाट्य तमाशा व मंगळवार दि. 5 सप्टेबर रोजी दुपारी 4. वा श्रीं ची मिरवणूक व विसर्जन कार्यक्रम होणार आहे.
या विविध कार्यक्रमांसाठी यावेळी मा.महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात, आ.डॉ.सुधीर तांबे, कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड.माधवराव कानवडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे,  कार्यकारी संचालक जग्गनाथ घुगरकर आदिंसह सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहे. तरी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिक,युवक व महिला भगिनींनी  लाभ घ्यावा असे आवाहन कार्याध्यक्ष बाबासाहेब वर्पे,सचिव कारभारी शेणकर,खचिनदार विजय जगताप,संचालक किशोर देशमुख,तात्यासाहेब धुळगंड,केशव  वर्पे,बाजीराव शिंदे,कैलास वर्पे,शंकर पानसरे,अरुण जोंधळे,सुर्यभान आहेर, भास्कर दातीर,अशोक कदम,राजेंद्र सस्कर व अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने करण्यात  आले आहे.