Breaking News

गणेश उत्सव बुलडाणा...




 विघ्नहर्ता गणेशाचे घरोघरी आगमन झाले. सकाळीच आपल्या आवडीच्या बाप्पाला घरी आणण्यासाठी गणेश भक्तांनी बाजारात गर्दी केली होती.गणेशोत्सवाला शुक्रवार पासून सुरुवात झाली सुबक, सुंदर व आकर्षक मुर्ती लक्ष वेधुन घेत होत्या. आपल्या आवडीची मुर्ती निवडतांना कुटुंबातील सदस्य त्यात सामिल झाले होते.घरोघरी गणरायाचे आगमन होणार असल्याने पारंपारिक पध्दतीने बाप्पाला आणण्यासाठी कुटुंबातील सगळेच सदस्य या आनंदात सहभागी होत असतात.विघ्नहर्त्या गणेशाचे आज घरोघरी आगमन असल्याने बाजारातसुबक, सुंदर व आकर्षक लाडक्या बाप्पांचे देखणे रुप अनेकांना मोहित करत होते.त्यामुळे कोणती मुर्ती खरेदी करावी याविषयी कुटुंबातील सदस्य एकमेकांशी हितगुज करत होते. छायाचित्र- रविकिरण टाकळकर, बुलडाणा.