Breaking News

कलारंग अ‍ॅकॅडमी आयोजित ’शाडु मातीची गणेश मूर्ती बनवा’ कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद

अहमदनगर, दि. 23, ऑगस्ट - कलारंग अ‍ॅकॅडमीच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट 2017 रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत राणाज वेलनेस सेंटर, सारस्वत बँकेच्या वर, दीपक हॉस्पिटल शेजारी, झोपडी कॅन्टीन येथे शाडु मातीची गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा संपन्न झाली. 
कार्यक्रमाची सुरुवात गणपती पूजन व राष्ट्रगीताने झाली. याप्रसंगी कलारंग अ‍ॅकॅडमीच्मा संचालिका सुजाता औटी-पायमोडे, विकास प्रकाश कांबळे, डॉ. श्यामा मंत्री, खुशबू पायमोडे व कलारंगची टीम असे उपस्थित होती.
सर्व मुलांना सुजाता औटी-पायमोडे यांनी कार्यशाळेत गणपती बनविण्याचे मार्गदर्शन केले व मुलांकडून सुबक गणेशमूर्ती बनवून घेतल्या. या कार्यशाळेत 100 मुलांनी सहभाग नोंदविला. चिमुकल्या हातांनी तयार केलेल्या गणपतीची घरी प्रतिष्ठापना करून व त्यासमोर सजावट करून त्याचा फोटो कलारंग अ‍ॅकॅडमीकडे पाठवावा, यातून काही विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.
शाडु मातीत पाणी टाकून मुलांनी चिखल तयार केला. नंतर सुबक असा गणपती तयार केला. आपल्या हातानी तयार केलेल्या गणपतीची प्रतिष्ठापना करणार हे मुलांना खूप समाधान देऊन जाते. त्यात खरी भक्ती ओतली जाते. विसर्जनाच्या दिवशी बादलीत पाणी घेऊन त्यात गणपतीचे विसर्जन करून ते पाणी झाडाला घालावे. म्हणजे निसर्गाचे संवर्धन सहजासहजी होऊन जाईल, असे संदेश यावेळी देण्यात आला.