Breaking News

बलात्कार्‍यांचा बचाव करणारेही तेवढेच दोषी - शोभा डे

नवी दिल्ली, दि. 27, ऑगस्ट - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांना न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर लेखिका शोभा डे यांनी याबाबतच्या आपल्या  प्रतिक्रिया ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. गुंड हा गुंड असतो, बलात्कारी हा बलात्कारीच असतो, अशा लोकांना वाचविणारे नेतेही तेवढेच दोषी आहेत.  त्यामुळे त्यांनाही शिक्षा करा, असे ट्विट त्यांनी केले आहे. तर, योगगुरू बाबा रामदेव यांनीही हिंसा पसरवणा-या राम रहिम यांच्या अनुयायांना हिंसाचार न  पसरवण्याचे आवाहन करणारे ट्विट केले आहे. प्रत्येकाने देशाच्या नियमांचा आदर केला पाहिजे, असे बाबा रामदेव यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे
दोन महिला अनुयायींवर बलात्कार केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी गुरमित राम रहिम यांना दोषी ठरवले. सोमवारी गुरमित  राम रहिम यांना शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.