Breaking News

पंतप्रधान मोदी 29 ऑगस्टला करणार 27 हजार कोटींच्या रस्ते योजनांचा शुभारंभ

नवी दिल्ली, दि. 27, ऑगस्ट - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदयपूर येथे 29 ऑगस्ट रोजी राजस्थानमधील 27 हजार कोटी रुपयांच्या 9 हजार 500 हून  अधिक रस्ते योजनांचा प्रारंभ होणार आहे . यामधील बहुतांश योजना पंतप्रधान ग्रामसडक योजना, ग्रामीण गौरव पथ व राजस्थान रस्ते क्षेत्र आधुनिकीकरण  योजनांतर्गत येतात. या प्रसंगी मुख्यमंत्री वसुंधरा राजे व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित रहाणार आहेत.
या अंतर्गत 14 हजार 371 किलोमीटर रस्त्यांची निर्मिती होणार असून यासाठी 11 हजार 543 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या बरोबरच 3 हजार  908 योजनांचे भूमीपूजन केले जाणार आहे. या अंतर्गत 10 हजार 900 किलोमीटर रस्त्यांची निर्मिती केली जाणार असून यासाठी 15 हजार 863 कोटी रुपयांची  गुंतवणूक केली जाणार आहे.
3 हजार किलोमीटरहून अधिक 109 योजनांसाठी रस्ते वाहतूक मंत्रालय व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अर्थपुरवठा केला जाणार आहे. या माध्यमातून महामार्गांचे  रूंदीकरण करणे व राज्यातील रस्त्यांची सुधारणा व निर्मिती यांचा समावेश आहे. या योजनेसाठी 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. याबरोबरच  पंतप्रधान मोदी 873 किलोमीटर लांबीच्या 11 महामार्गांचे उद्घाटन करणार आहेत.