Breaking News

‘सह्याद्रि’वर ऑलंम्पिक पध्दतीच्या कुस्त्या

मसूर, दि. 31 (प्रतिनिधी) : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यावर प्रतिवर्षी गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सवामध्ये ऑलम्पिक पध्दतीच्या कुस्त्या व निकाली  कुस्त्यांचे आयोजन करण्यात येते. तथापि, ऐनवेळी येणार्‍या पावसामुळे कुस्त्यांच्या आयोजनामधील अडचणी विचारात घेवून, यंदाच्या ऑलम्पिक पध्दतीच्या व  निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान, संस्थापक आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून शुक्रवार, दिनांक 29 सप्टेंबर, 2017  रोजी ऑलम्पिक पध्दतीच्या कुस्त्या व रविवार, दि. 1 ऑक्टोबर, 2017 निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आल्याची माहिती कार्यकारी संचालक  आर. सी. बडगुजर व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व्ही. बी. चव्हाण यांनी दिली. दि. 29 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर, 2017 रोजी होणार्‍या ऑलम्पिक पध्दतीच्या व  निकाली कुस्त्यांसाठी इच्छूक पैलवानांनी व कुस्ती शौकीन यांनी आवश्य सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.