Breaking News

सातारा जिल्ह्यात सेवा उद्योग उभारण्याच्या मोठ्या संधी : संगीता खंदारे

सातारा, दि. 31 (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यात सेवा उद्योग उभारण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. तरुणांनी मार्केटच्या मागणीचा विचार करुन प्रशिक्षण घ्यावे  व आपला उद्योग उभा करावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी संगीता खंदारे यांनी केले.
येथील आयडीबीआय गणेशोत्सव मंडळाच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत जिल्हा माहिती कार्यालयातर्फे संवादपर्व कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी  श्रीमती खंदारे बोलत होत्या. जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी प्रारंभी मान्यवरांना लोकराज्य अंक व आपला जिल्हा सातारा पुस्तिकेचे अंक देवून  स्वागत केले. यावेळी आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक प्रदीप करंदीकर, आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक दीपक कुलकर्णी, प्रशिक्षक  विजय आडसूळ, निलेश सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते.
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत दोन महिन्यातून एकदा रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाते, असे सांगून खंदारे पुढे म्हणाल्या,  खासगी आस्थापंनामध्ये कौशल्य विकास असणार्‍या मनुष्य बळांची मोठी मागणी आहे. कौशल्य विकासाला आता फार महत्व प्राप्त झाले आहे. तरुणांनी नोकरीच्या  मागे न लागाता आपले स्वत:चे कौशल्य वध्दींगत करावे. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 596 विषयांवर प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण  घेण्यासाठी 18 ते 45 वर्षापर्यंतची वयोमर्यादा ठेवली आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते. या प्रमाणपत्राला खूप महत्व असून तुम्हाला या  प्रमाणपत्राच्या अधारे खासगी आस्थपनांमध्ये नोकरी मिळू शकते. ज्या जाती जमातीसाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही अशा जाती जमातींच्या आर्थिक दृष्ट्या  दुर्बल घटकातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवाकरांकरीता आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे बीज भांडवल कर्ज योजना राबविली जाते. या योजनेमध्ये  बँकेचा सहभाग 60 टक्के असून उमेदवाराचा 5 टक्के व 35 टक्के महामंडळाकडून देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा,  वय 18 ते 45 वर्षे, अर्जदार रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रात ऑनलाईन नाव नोंदविलेलेला असावा, अर्जदाराच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाखापर्यंतचे  असावे, अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती कोणत्याही बँकेची थकबाकीदार नसावी. या योजनेच्या लाभासाठी व अधिकच्या माहितीसाठी कौशल्य विकास रोजगार व  उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन खंदारे यांनी केले.
आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक प्रदीप करंदीकर व आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक दीपक कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयातर्फे शासनाच्या विविध योजनांची माहिती विविध माध्यमांना पोहचविण्याचे काम या कार्यालयाकडून  केले जाते. जनता आणि शासन यांच्यातील दूवा म्हणून हे कार्यालय काम करते. राज्य शासनाने समाजाला दिशा देण्यासाठी, नवी पिढी घडविण्यासाठी विविध  योजना सुरु केल्या आहेत. या योजनांची माहिती व्हावी यासाठी संवादपर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संवादपर्व या उपक्रमांतर्गत शासन आणि जनता  यांच्यात संवाद साधण्याचे काम केले जाते. रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ुुु.ारहरपशुी.र्सेीं.ळप  या  संकेतस्थळाला भेट द्या. या संकेतस्थळावर रोजगार बातम्या, मान्यवरांचे लेख तसेच विविध योजनांची माहिती उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी  युवराज पाटील यांनी प्रास्ताविकात दिली. या कार्यक्रमास आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणर्थी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.