Breaking News

’टॉयलेट एक प्रेम कथा’ ची भारतासह जगभरात दमदार कमाई

मुंबई, दि. 24, ऑगस्ट - अभिनेता अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमा भारतात दमदार कमाई केली आहे. भारतासोबतच  या सिनेमाने परदेशातील बॉक्स ऑफिसवरही मोठा गल्ला जमवला आहे.
या सिनेमाने भारतात 159.79 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे.  तर इेश्रश्रूुेेवर्हीपसरार.लेा च्या आकडेवारीनुसार या सिनेमाने परदेशात आतापर्यंत 24.32  कोटी रुपये कमाई केली आहे. या सिनेमाची भारतातील ग्रॉस कमाई आणि ओव्हरसीज कमाई मिळून 184.11 कोटी रुपये झाली आहे. म्हणजे टॉयलेट एक प्रेम  कथाने वर्ल्डवाईड 184 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. टॉयलेट एक प्रेम कथा हा एक सामाजिक संदेश देणारा सिनेमा आहे. केवळ 18 कोटी रुपये एवढ्या  बजेटमध्ये हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या या सिनेमाने बजेटचा खर्च अगोदरच वसूल केला आहे.