राजीव गांधी हत्याप्रकरणातील आरोपीला एका महिन्याचा पॅरोल मंजूर
नवी दिल्ली, दि. 25, ऑगस्ट - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी ए.जी. पेरारिवलन याला एका महिन्याचा पॅरोल तामिळनाडू सरकारने मंजूर केला. आजारी वडिलांची भेट घेण्यासाठी पेरारिवलनना पॅरोल मंजूर केली. या कालावधीत पेरारिवलनच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश सरकारने पोलीस महासंचालकांना दिले आहेत. पेरारिवलनच्या आईसह काही राजकीय पक्षांनी पेरारिवलनला पॅरोल देण्यासंदर्भातील मागणी सरकारकडे केली होती.
46 वर्षींय पेरारिवलन गेल्या 26 वर्षांपासून कारागृहात आहे. या प्रकरणातील अन्य एक आरोपी नलिनी हिला दोन वेळा पॅरोल मंजूर करण्यात आला होता.
46 वर्षींय पेरारिवलन गेल्या 26 वर्षांपासून कारागृहात आहे. या प्रकरणातील अन्य एक आरोपी नलिनी हिला दोन वेळा पॅरोल मंजूर करण्यात आला होता.