Breaking News

देशभरात 11 लाखांहून अधिक पॅनकार्ड रद्द - संतोष गंगवार

नवी दिल्ली, दि. 03, ऑगस्ट - देशभरातील 11 लाख 44 हजारांहून अधिक पॅनकार्ड बंद किंवा रद्द करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोष  कुमार गंगवार यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
एकाच व्यक्तीच्या नावे एकापेक्षा अधिक पॅनकार्ड देण्यात आली आहेत, अशी 11 लाख 44 हजार 211 पॅनकार्ड बंद किंवा रद्द करण्यात आली आहेत. प्रत्येक व्यक्तीला  एकच पॅनकार्ड देण्याचा नियम आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. 27 जुलैपर्यंत 1 हजार 566 बनावट पॅनकार्ड असल्याचे उघड झाले असल्याचेही  गंगवार यांनी म्हटले आहे.