Breaking News

स्वच्छता पंधरवाड्यांतर्गत विद्यार्थ्यांनी केली बसस्थानकाची स्वच्छता

अकोले महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना, मुक्त विद्यापीठाचा उपक्रम 

अहमदनगर, दि. 25, ऑगस्ट - येथील अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयातील वरीष्ठ व कनिष्ठ विभाग राष्ट्रीय सेवा योजना,  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता पंधरवाडांतर्गत स्वच्छ स्वस्थ भारत अभियान निमिताने स्वच्छता दिंडी काढून  प्रत्यक्ष स्वच्छता करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय ताकटे, प्रा. सुरेश मालुंजकर तसेच मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव श्री. सोनवणे, विद्यार्थी सेवा विभागाचे डॉ. प्रकाश देशमुख व वरीष्ठ  शैक्षणिक सल्लागार डॉ. प्रमिला भामरे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी ग्रामिण रुग्णालय, अकोले बसस्थानक, अकोले विश्रामगृह या ठिकाणी  जाऊन प्रत्यक्ष स्वयंसेवकांनी स्वच्छता केली.
अकोले बसस्थानकावर स्वच्छतेबद्दल जनजागृती करणारे पथनाट्य सादर करण्यात आले. वरीष्ठ विभागाचे कार्यक्रम अधिकारी  प्रा. डॉ. सुनिल मोहटे, प्रा. भानुदास  खताळ, प्रा. डॉ. सौ. महेजबीन सय्यद, प्रा. डॉ. विजय काळे, प्रा. कु. शैला बोरसे, प्रा. सलीम शेख तसेच कनिष्ठ विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस.  बिराजदार, प्रा. कर्पे, प्रा. कोरडे यांचे मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान यशस्वी केले.
मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक प्रा. देवदत्त शेटे, केंद्र सहाय्यक संजय फटांगरे यांचे मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विश्रामगडावरही स्वच्छता...
अकोले तालुक्यातील पट्टाकिल्ला अर्थात विश्राम गडावरही राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. किल्ल्याच्या पायथ्यापासून ते  अंबारखान्यापर्यंत प्लास्टिकचे कागद, पाण्याच्या बाटल्या, चॉकलेटचे कागद व  सर्व कचरा जमा करुन त्याची विल्हेवाट लावली. जैव विविधतेला होणारा धोका  ओळखुन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.