Breaking News

श्रीश्रीरविशंकरविद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये गणेशमूर्ती प्रकल्प उत्साहात

अहमदनगर, दि. 25, ऑगस्ट - सुमेरु एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीश्रीरविशंकर विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये गणेशोत्सवानिमित्त गणेशमूर्ती प्रकल्प  उत्साहात संपन्न झाला.
मुलांना शैक्षणिक संस्काराबरोबर अध्यात्मिक संस्कार व्हावे म्हणून पर्यावरणपूरक मूर्ती बनविणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्रीश्रीरविशंकर विद्यामंदिर असे  अभिनव सांस्कृतीक उपक्रम राबविण्यास अग्रेसर असते.
पर्यावरणपूरक मूर्ती बनविणे या कार्यक्रमात माहिती देताना आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यकर्त्या अंकिता मणियार यांनी मुलांना स्वत:च्या हाताने शाडू मातीपासून मूर्ती  बनविण्यास शिकविले व त्यातूनच आपणास मूर्ती बनविताना मिळणारा आनंद कसा असतो? तसेच त्यांनी निसर्गाची हानी टाळताना तसेच उदयांचे प्रदूषण कसे  टाळता येईल हेही सांगितले, मुलांमध्ये निसर्गाविषयी आपुलकीची भावना निर्माण केली, कोणताही उत्साह साजरा करताना निसर्गाच्या विरोधात किंवा निसर्गाची हाानी  न करता साजरा करणे हाही उद्देश ठेवून भावी पिढीवर त्याचे उत्तम संस्कार होतील अशा शब्दात त्यांनी माहीती दिली. या कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा सौ.  स्वाती शाह, प्राचार्या सौ. आरती सप्रा, उपप्राचार्या सौ. ज्रयोतिर्मया चव्हाण व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.