Breaking News

जय श्रीराम नेता सुभाष तरुण मंडळाच्या आकर्षक डिजिटल कारंजा देखाव्याचे उद्घाटन

मंडळांनी धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात सहभाग द्यावा - हभप भास्करगिरी महाराज

अहमदनगर, दि. 29, ऑगस्ट - गणेशोत्सव हा सामाजिक एकतेचा संदेश देणारा उत्सव आहे. त्यामुळे या उत्सवात आपण आपली संस्कृती, परंपरा जपल्या पाहिजे.  मंडळांनी या धार्मिक कार्याबरोबर सामाजिक कार्यातही सहभाग घेतला पाहिजे. मंडळांनी देखावा सादर करताना त्यात ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक संदेश देणारे  असावेत. त्यातून येणार्या भाविकांना आनंद मिळाला पाहिजे. जय श्रीराम नेता सुभाष तरुण मंडळाने डिजिटल लायटिंगच्या विविध रंगामुळे आपले जीवनही असेच  अनेक रंगानी रंगून जावे. तसेच कारंजामुळे आपणास प्रसन्नता वाटावी अशा पद्धतीने ही निर्मिती केली आहे. मंडळाच्यावतीने जे विविध सामाजिक उपक्रम राबविले  जातात, ते कौतुकास्पद असेच आहेत, असे प्रतिपादन हभप भास्करगिरी महाराज यांनी केले.
जय श्रीराम नेता सुभाष तरुण मंडळाच्या आकर्षक डिजिटल कारंजा देखाव्याचे उद्घाटन हभप भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना  उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, मंडळाचे अध्यक्ष विक्रम राठोड, गणेश कवडे, भगवान फुलसौंदर, संजय शेंडगे, संभाजी कदम, अनिल बोरुडे, दत्ता  मुदगल, सुरेश तिवारी, सतीश मैड, गणेश अष्टेकर, पंकज पंड्या, मेहूल भंडारी, ऋषभ भंडारी, शशिकला राठोड, सुरेखा भोसले, आशा निंबाळकर आदि
उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मंडळाचे मार्गदर्शक शिवसेना उपनेते अनिल राठोड म्हणाले, जय श्रीराम नेता सुभाष तरुण मंडळाने दरवर्षी वेगवेगळे पौराणिक, ऐतिहासिक,  सामाजिक देखावा सादर केले आहेत. तसेच अनेक सामाजिक काम मंडळाचे कार्यकर्ते करत असतात. वृक्षारोपण, अन्नदान, आरोग्य शिबीराच्या माध्यमातून
सर्वसामान्यांची सेवा या मंडळाच्याकडून होत असते. गणेशोत्सव काळात गर्दीचे नियोजन करुन महिलांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते. यावेळी महापौर सुरेखा  कदम, भगवान फुलसौंदर आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी हभप भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. तसेच हभप  भास्करगिरी महाराज यांची पंढरपुर देवस्थानच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अनिल राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रास्तविकात मंडळाचे अध्यक्ष विक्रम राठोड म्हणाले, दरवर्षी वेगवेगळे देखावे सादर करण्याची मंडळाची परंपरा आहे. यंदाच्या वर्षी डिजिटल लायटिंग व आकर्षक
कारंजाचा देखावा हा लहान थोरांचे आकर्षक ठरत आहे. मंडळाच्यावतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात, त्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते
आपला सहभाग देत असतात. नागरिकांनी या देखाव्या आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी संजय चोपडा, दिगंबर ढवण, वैभव सुरवसे, संदिप  कुलकर्णी, सुषमा पडोळे, निर्मला धुपधरे, गणेश कुलथे, शशिकांत देशमुख, राजेंद्र दळवी, कैलास शिंदे व पदाधिकारी आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.