Breaking News

विद्यापीठास मानांकनसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा - कुलगुरू

औरंगाबाद, दि. 08, ऑगस्ट - नॅक, एनआयआरएफ यासह विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मानाकंनात आपल्या महाविद्यालयाचा क्रमांक यावा. यासाठी प्राचार्यांनी  प्रयत्नांची पराकाष्टा करावी, असे आवाहन कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मनुष्यबळ विकास केंद्रात प्रबोधिनी  प्राचार्यांची कार्यशाळा नुकतीच झाली. समारोपप्रसंगी संचालक डॉ.आर.जी.मार्टीन, विशेष कार्यासन अधिकारी डॉ.वाल्मिक सरवदे, अधिष्ठाता डॉ.संजय साळुंके,  डॉ.मजहर फारुकी, डॉ.दिलीप खैरनार, सहसंचालक डॉ.मोहम्मद अब्दुल राफे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे म्हणाले, विद्यापीठ अनुदान  आयोगाने जागतिक स्पर्धेतील आपल्या संस्था टिकावण्यात म्हणून विविध उपाययोजना केल्या आहेत. इन्स्टिटयूशनल रँकींग फेमवर्क ही राष्ट्रीय मानांकन संस्था सुरु  केली आहे. तसेच गुणवत्ता, नवोन्मेष व दर्जेदार संशोधन याला प्राधान्य दिले आहेत. आपल्या विद्यापीठाने देखील इंटरनल क्वालिटी ऍश्यूरन्स सेल’च्या माध्यमातून  मानांकनासाठी प्रयत्न केले आहेत. इंडिया टुडे, विकच्या मानांकनात पहिल्या 50 मध्ये आपल्या विद्यापीठाने स्थान पटकविले आहे. शिक्षणासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा’  वापर करुन प्राचार्यांनी स्वत:ला अपडेट ठेवावे, असे आवाहनही मा. कुलगुरु यांनी केले. सकाळच्या सत्रात डॉ.विजयकुमार फड, प्रा.पुरुषोत्तम राव, डॉ.अर्चना ठोस,  डॉ.एल.एस.मातकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाहेत 180 प्राचार्यांनी सहभाग घेतला. कार्यशाळेसाठी नितीन गायकवाड, अशोक ठोंबरे अर्चना येळीकर, राजु कणीसे,  मदन गहिरे, गौरव जाधव आदींनी प्रयत्न केले.