Breaking News

किटकनाशकामुळे 9 महिलांना विषबाधा!

बुलडाणा, दि. 24 -  शेतात रासायनिक कीटकनाशकामुळे नऊ महिला मजुरांना  विषबाधा झाल्याची घटना तालुक्यातील रामपूर येथे 22 ऑगस्ट  रोजी घडली.  त्यांना  उपचारासाठी प्रथम नांदुरा येथील आरोग्य  केंद्रात भरती केले होते; मात्र यातील काहींची प्रकृती खालावल्याने  खामगाव येथील सामान्य रुग्णालयात  उपचारासाठी आणण्यात  आले आहे.
तालुक्यातील रामपूर येथील शेतमजूर मक्याच्या खोडातील  कीडनाशक टाकण्यासाठी गेले होते. शेतातून घरी परतल्यानंतर त्यातील बहुतांश महिला शेतमजुरांना  उलटी, मळमळ, अंधुक दिसणे आदी त्रास सुरू झाल्याने त्यांना नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी भरती करण्यात आले.
यामध्ये ताईबाई प्रल्हाद बोपडे (वय 40 वर्षे), मायावती गोपाल  दांडगे (वय 40 वर्षे), ज्योती संजय बेलोकार (वय 33 वर्षे),  पंचफुला अभिमन्यू दांडगे,  शाहनाजबी शेख हुसेन, राधाबाई रमेश  लहाने (वय 35 वर्षे), कल्पना कैलास बेलोकार (वय 34 वर्षे),  रुख्माबाई प्रेमलाला लोणकर (वय 36 वर्षे), सईबाई  बळीराम  कावरे यांचा समावेश आहे.