पाकिस्तानने 5 वर्षांत 298 भारतीयांना दिले नागरिकत्व
नवी दिल्ली, दि. 21, ऑगस्ट - पाकिस्तानने गेल्या 5 वर्षांत सुमारे 298 भारतीयांना नागरिकत्व दिले, अशी माहिती पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाकडून देण्यात आली.
पाकिस्तानने 2012 ते 14 एप्रिल 2017 दरम्यान 298 भारतीयांना नागरिकत्व दिले आहे. 2012 मध्ये पाकिस्तानने 48 भारतीयांना नागरिकत्व दिले होते. 2013 मध्ये 75 तर, 2016 मध्ये 76 भारतीयांना पाकिस्तानचे नागरिकत्व देण्यात आले आहे, असे सत्तारूढ पाकिस्तान मुस्लिम लीगचे खासदार शेख रोहेल असगर यांनी सांगितले. 2015 मध्ये केवळ 15 भारतीयांना पाकिस्तानने नागरिकत्व दिले होते. तर, 2016 मध्ये 69 भारतीयांना नागरिकत्व देण्यात आले आहे. एप्रिलपर्यंत 14 जणांना पाकिस्तानचे नागरिकत्व मिळाले आहे.