भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यावर दगडफेक
नवी दिल्ली, दि. 21, ऑगस्ट - दिल्ली भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यावर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यातून तिवारी थोडक्यात बचावले. दिल्लीतील बवाना विधानसभा मतदार संघात आयोजित कार्यक्रमात बोलत असताना अज्ञातांनी तिवारी यांच्यावर हल्ला केला.
तिवारी यांच्यावर लाकडाचे तुकडे आणि दगडफेक करण्यात आल्याची माहिती आम्हाला मिळाली. या प्रकरणी अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक ऋषिपाल सिंग यांनी दिली.
बवाना येथे 23 ऑगस्ट रोजी पोटनिवडणूक होत आहे. या जागेसाठी आप मधून बाहेर पडलेले वेद प्रकाश भाजपकडून लढत आहेत.