Breaking News

लष्कराच्या 39 गोशाळा बंद करण्याचा संरक्षण मंत्रालयाचा निर्णय

नवी दिल्ली, दि. 08, ऑगस्ट - देशातील 39 लष्करी गोशाळा बंद करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. या 39 गोशाळांमध्ये देशातील सर्वात  उत्तम प्रजातींच्या 20 हजार गायी आहेत. सध्या या गोशाळांमध्ये तब्बल 2500 कर्मचारी काम करत आहेत. त्यामुळे निर्णयाने या कर्मचा-यांच्या नोकरीच्या  भवितव्याबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे .मागील महिन्यात मंत्रिमंडळाच्या समितीने लष्कराला आदेश जारी करत 3 महिन्यात या गोशाळा बंद करण्यास  सांगितले.
मंत्रिमंडळाच्या समितीने दिलेल्या अहवालात लष्कराने दुधासाठी डेअरीचा वापर करावा, असे म्हटले आहे. मागील काळात लष्कराच्या गोशाळेत भ्रष्टाचार होत  असल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या निर्णयामुळे मेरठ, झाशी, कानपूर, अंबाला यासह अन्य काही  शहरांमधील लष्करी गोशाळा बंद होणार आहेत.