ब्लू व्हेल गेम ची दहशत; सीबीएसई कडून शाळांना मार्गदर्शक सूचना जारी
नवी दिल्ली, दि. 21, ऑगस्ट - ब्लू व्हेल गेम मुळे झालेल्या लहान मुलांच्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांमध्ये इंटरनेट व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या वापराबाबत मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत.
यामध्ये मुलांना इंटरनेटचा सुरक्षित वापर करण्याची माहिती देण्याबरोबरच स्मार्टफोन, टॅबलेट, आयपॅड, लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू परवानगी घेतल्याशिवाय शाळेत आणता येणार नाहीत, अशा सूचना शिक्षण मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.
शाळांमध्ये अधिक चांगल्या वाचन-लेखनासाठी सुरक्षित शैक्षणिक वातावरणाला प्रोत्साहन दिले पाहिजे. यासाठी शाळांनी आपल्या परिसरात माहिती-तंत्रज्ञान संपन्न उपकरणांच्या माध्यमातून उपयुक्त नसलेल्या गोष्टी रोखण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. मुलांना इंटरनेटच्या सुरक्षित वापराची माहिती देण्यात यावी. इंटरनेटच्या योग्य वापराच्या नियमांच्या दृष्टीने जागृत केले पाहिजे. शाळांमधील सर्व संगणकांमध्ये योग्य त्या सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही शिक्षण मंडळाने दिल्या आहेत.