उत्तर प्रदेशात बांगलादेशी दहशतवाद्याला अटक
मुजफ्फरनगर,दि.6 : उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर येथे दहशतवादविरोधी पथकाने एका बांगलादेशी दहशतवाद्याला अटक केली आहे. अब्दुल्लाह असे या दहशतवाद्याचे नाव आहे. अब्दुल्लाह चा दहशतवादी कारवायांत सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्याकडून बनावट आधार कार्ड, पारपत्र, ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ब्रिजेश श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखालील ही कारवाई करण्यात आली. भारतात राहण्यासाठी त्याने बनावट आधार कार्ड आणि पारपत्र तयार करुन घेतले होते. तो मुजफ्फरनगर जिल्ह्यात 2011 पासून राहत होता. अब्दुल्लाह हा बांगलादेशी दहशतवाद्यांना बनावट पारपत्र देण्याचे काम करत होता, असे अधिका-यांनी सांगितले. अब्दुल्लाह हा ‘अन्सरूल्ला बांगला’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे.
