सांगलीत भरदिवसा बंद फ्लॅट फोडून 21 लाखाची चोरी
सांगली, दि. 01, ऑगस्ट - सांगली शहरातील शंभर फुटी रस्त्यावरील गोकुळ धाम या रहिवासी संकुलातील अमोल नानासाहेब पाटील यांचा बंद फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्यांनी 25 तोळे सोन्याचे दागिने व रोख 15 लाख रूपयांची रोकड असा एकूण 21 लाख नऊ हजार रूपये 700 किंमतीचा ऐवज लंपास केला. भरदिवसा घडलेल्या चोरीच्या या घटनेने या भागात एकच खळबळ उडाली आहे.
शंभर फुटी रस्त्यावरील चेतना पेट्रोल पंपासमोर गोकुळ धाम या संकुलात पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 19 मध्ये अमोल पाटील कुटुंबियासह राहतात. त्यांचे मूळ गाव आष्टा असून तेथे ते शेती व्यवसाय करतात. काल रविवारी सकाळी काही कार्यक्रमानिमित्त अमोल पाटील कुटुंबियासमवेत बाहेर गेले होते. सोमवारी दुपारी परत आल्यानंतर त्यांना फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसला व आपल्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. अज्ञात चोरट्यांनी त्यांचा फ्लॅट बंद असल्याचे पाहून ही चोरी केली.
अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलुप तोडून घरात प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडून त्यातील लॉकर उचकटून रोख 15 लाख रूपये व 25 तोळे सोन्याचे दागिने असा एकूण 21 लाख नऊ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी सोन्याचा 84 ग्रॅम वजनाचा धर्मकाटा, 30 ग्रॅम वजनाचा नेकलेस, 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट, 30 ग्रॅम वजनाचे वेढण, 15 ग्रॅम वजनाची चेन, 30 ग्रॅम वजनाच्या अंगठ्या व दहा ग्रॅम वजनाचे ब्रेसलेट या सोन्याच्या दागिन्यांसह दहा हजार रूपये किंमतीच्या चांदीच्या वस्तू असा ऐवज लंपास केला.
अमोल पाटील यांनी या घटनेची माहिती तात्काळ विश्रामबाग पोलिसांना दिली. विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरूवात केली. याबाबत अमोल पाटील यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीमती संगिता माने करीत आहेत.