Breaking News

20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर सामाजिक ऐक्य पंधरवडा

मुंबई, दि. 23, ऑगस्ट - केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत सद्भावना दिवसाच्या अनुषंगाने दिनांक 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2017  हा पंधरवडा सामाजिक ऐक्य पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्मांच्या व अनेक भाषा बोलणार्‍या  लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना सौहार्द भाव वृद्धिंगत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उद्दिष्टे या पंधरवडा साजरा करण्यामागे असून या  निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी मानवी साखळी सारखे कार्यक्रम राज्यातील जिल्हा मुख्यालयात, संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  आयोजित करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी युवक परिषदा आयोजित करुन त्यामध्ये जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांना भाषण देण्यासाठी निमंत्रित  करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. पंधरवड्यात जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी तसेच बृहन्मुंबईत सांस्कृतिक संचालनालयामार्फत इतर सांस्कृतिक  कार्यक्रम आयोजित करणे सूचित करण्यात आले आहे.
हा शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 201708111753598914 असा आहे.