Breaking News

सचिनची खासदार निधीतून सांगलीतील पाणी पुरवठा योजनेसाठी 15 लाखांची मदत

सांगली, दि. 24, ऑगस्ट - भारताचे महान क्रिकेटर आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर यांनी सांगलीमधल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातल्या पाणीपुरवठा  योजनेसाठी आपल्या खासदार निधीतून 15 लाख रुपयांचं अर्थसहाय्य केलं आहे. तासगाव तालुक्यातल्या तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख संजय बारकुंड यांनी  ही माहिती दिली.या केंद्रातल्या पाणीपुरवठा योजनेला अर्थसहाय्य करावं म्हणून आपण अनेक दिग्गजांना लेखी निवेदन दिलं होतं. पण सचिन तेंडुलकर यांचा अपवाद  वगळता कुणीच आपल्याला दाद दिली नसल्याचं बारकुंड यांनी सांगितलं. सचिन यांनी मात्र आमचं निवेदन मिळताक्षणी त्यांच्या खासदार निधीतून 15 लाख रुपये  मंजूर केल्याचं बारकुंड यांनी सांगितलं.