Breaking News

सातार्‍यात 15 वर्षीय मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत

सातारा, दि. 03, ऑगस्ट - सातार्‍यामध्ये लग्नाचं आमिष दाखवून 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी संदीप देशमुखला  अटक करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार आरोपीनं लग्नाचं आमिष देऊन 15 वर्षाच्या मुलीवर अनेकदा बलात्कार केला. पीडित मुलगी गरोदर राहून तिनं एका बाळाला जन्मही दिला आहे.  पीडितेला आई-वडील नसल्यानं हे प्रकरण दडपण्यासाठी तिच्या आजी-आजोबांवर बराच दबाव टाकण्यात येत होता. दोन दिवसापूर्वी पीडित मुलीनं घरातच बाळाला  जन्म दिला. याबाबतची माहिती मेढा तहसिलदारांना समजल्यानंतर त्यांनी स्वत: मुलीची विचारपूस केली त्यानंतर मुलीच्या तक्रारीनंतर आरोपी संदीप देशमुखला  बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.